खुशखबर ! ‘तान्हाजी’ सिनेमा मराठीत येणार, ‘या’ दिवशी होणार ‘ट्रेलर’ रिलीज…

0
43
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंदेरी दुनिया । तान्हाजी द अनसंग वॉरियर या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. दरम्यान हा सिनेमा हिंदी भाषेत होता. अनेकांनी आग्रह धरला की हा सिनेमा मराठीतही डब केला जावा. यासाठी मनसेनंही पाठिंबा दिला होता. लवकरच हा सिनेमा मराठीत प्रदर्शित केला जाणार आहे. लवकरच तान्हाजी सिनेमाचा मराठी ट्रेलर रिलीज होणार आहे. ओम राऊत यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. अभिनेता अजय देवगननं यात तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री आणि अजय देवगनची पत्नी काजोल हिनं या सिनेमात तानाजींच्या पत्नीची म्हणजे सावित्रीबाईंची भूमिका साकारली आहे.

 

तान्हाजी सिनेमा मराठीत येत असल्यानं चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसत आहे. हा सिनेमा 10 जानेवारी 2020 रोजी प्रसिद्ध होणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शनं याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. 10 डिसेंबर 2019 रोजी मराठी भाषेत तान्हाजी सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला जाणार आहे. शरद केळकरनं या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. याशिवाय या सिनेमात देवदत्त नागे (सूर्याजी मालुसरे), शशांक शेंडे (शेलार मामा) हेही कलाकार आहेत.

 

दरम्यान तान्हाजी सिनेमाचा ट्रेलर भरपूर गाजला आहे. सिनेमाला घेऊन चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता पहायला मिळत आहे. या सिनेमात अभिनेता सैफ अली खान किल्लेदार उदयभान राठोडच्या भूमिकेत दिसणार आहे. अजयचा हा 100 वा सिनेमा असून थ्रीडीमध्ये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here