टीम, HELLO महाराष्ट्र |हिंदू धर्मामध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात. त्यातील महत्वाचा उत्सव म्हणजे गणेशोत्सव होय आणि आता अवघ्या काही दिवसात गणेशोत्सव सुरु होणार असल्याने गणपतीच्या साहित्याने शहरातील सर्व बाजारपेठा सजल्या आहेत. गणपतीसाठी लागणारे सर्व साहित्य बाजारात उपलब्ध झाले आहे. अनेक गणेश भक्तांची आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याची बाजारात एकच झुंबड उडाली आहे. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठा लगबगून गेल्या आहेत.
मंडप सजावटीसाठी लागणारे झालर, पडदे, कंठी, मखर, आयुधे, भक्तिगीतांच्या सीडी, दिव्यांच्या माळा, गणपती व इतर साहित्य बाजारपेठेत येण्यास सुरुवात झाली आहे. पांरपरिक वाद्यांचे पथक, बेंजो, ढोल-ताशा वाजविणार्या कलाकारांच्या वेळेचे नियोजन, मंडप उभारणी, प्रकाश व्यवस्था, पडदे, सजावट, वर्गणी गोळा करणे आणि मिरवणुकीची तयारी सर्वत्र सुरु असल्याचे चित्र शहरभर पाहायला मिळत आहे.
लाकडी मखरसह गणेशोत्सवात डिजिटल प्रिटिंग, थ्रीडी इफेक्ट, फोम मखर खरेदी, वजनाने हलकी, हाताळायला सोपी, वाजवी दरामुळे विविध प्रकारची मंदिरे, राजमहाल आणि डिजिटल मखर, टिकल्यांचे नक्षीकाम, रेशमी, वेलवेट या प्रकारातील झालरी, झेंडे, विविध प्रकारचे दिवे, तोरण याचबरोबर पाश, कुर्हाड या आयुधांच्या प्रतिकृतीं घेण्यासाठी शोधाशोध केली जात आहे.
हे पण वाचा –
गणेश मंडळांसाठी खुशखबर! सवलतीच्या दरात मिळणार वीज
गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांसाठी खुशखबर
सार्वजनिक गणेशोत्सव कसा सुरु झाला…? जाणून घ्या
बाप्पाला नैवेद्य म्हणून ‘या’ सोप्या पद्धतीने बनवा ‘उकडीचे मोदक’
गणेशोत्सवाच्या धर्तीवर बाजारपेठा सजल्या ; साहित्य खरेदीसाठी गणेश भक्तांची झुंबड