गर्भधारणेनंतर सहजरित्या होऊ शकते वजन कमी ; स्वयंपाक घरातील ‘या’ गोष्टीचा करा वापर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । गर्भधारणेच्या काळात अनेक स्त्रियांना वेगवेगळ्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते. ते दिवस त्याच्यासाठी खूप महत्वाचे असतात. त्या काळात खूप काळजी घ्यावी लागते. त्या काळात स्त्रियांनी आपल्या आहारावर विशेष प्रयत्न घ्यावे लागतात. त्या दिवसात जास्तीत जास्त वजन वाढवण्याच्या प्रयत्न स्त्रिया करत असतात. त्या काळात शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे बदल होत असतात. त्या काळात वाढलेले वजन कमी करण्यासाठी त्यानंतर खूप प्रयत्न करावे लागतात.

मुलाच्या जन्मानंतर महिलांना जीवन शैली बदलायला खुप वेळ द्यावा लागतो. त्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो. प्रसूती नंतर त्या काळात वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न त्या महिलांकडून केले जातात. वजन वाढल्याने अनेक वेळा बीपी चा त्रास होण्यास सुरुवात होते. हृदयाशी संबंधित आजार वाढण्यास सुरुवात होते. त्यामुळे ते आपल्या बाळासाठी आणि त्या आईसाठी सुद्धा धोकादायक असू शकते. त्यामुळे घरगुती उपयांचा वापर करून घराच्या घरी आपण वजन कमी करू शकतो.

मेथीचे दाणे —
याचा आहारात समावेश करा. दररोज एक चमचा दाणे भिजत टाकून ते दुसऱ्या दिवशी सकाळी खावे. ते दाणे भिजल्यानंतर एका ठराविक पाण्यामध्ये उकळून खाल्ले किंवा त्याचे पाणी पिले तरी ते शरीरासाठी जास्त फायदेशीर आहे. त्याचे पाणी पिल्यानंतर सुद्धा त्याचा फायदा वजन कमी करण्यसाठी केला जातो.

जिरे —
जिरे पाण्यात टाकून ते पाणी उकळावं नंतर ते पाणी फिल्टर मधून बाजूला काढून ते पाणी एका बाटलीमध्ये भरून ठेवा. त्याच्या नंतर ते पाणी दररोज सकाळी पाणी प्या . त्यानंतर त्याची जिरे पूड तयार करून सुद्धा त्याचा वापर आहारात करू शकतो. तसेच जिरे हे ऍसिडिटी साठी वापरतात.

ओवा —
ओवा हे अनेक औषधी गुणधर्मा नि बनलेला आहे. ओवा पाण्यात टाकून त्याचा वापर पिण्यासाठी केल्यानंतर त्याचा फायदा हे आपले यूट्रिन साफ करण्यासाठी वापर केला जातो. तसेच अनेक वेळा पोटात दुखत असेल तर ओवा याचा वापर केला जातो.

बडीशेप —
बडीशेप चा वापर वजन कमी करण्यासाठी केला जातो. तसेच अनेक वेळा गॅस चा त्रास होत असेल त्या वेळी याचा वापर केला जातो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’ 

Leave a Comment