गुन्हे शाखेच्या कारवाईत ६ लाखांच्या दारूसह दोघांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर प्रतिनिधी | नागपुराहुन चंद्रपूर येथे आणत असलेला ६ लाख रुपये किमतीचा दारूसाठा पोलिसांनी जप्त केला. प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चौकात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. यात स्कार्पिओ वाहनासह दोघांना अटक करण्यात आलीआहे. एका स्कार्पिओ वाहनातून मोठा दारूसाठा चंद्रपुरात येत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.

या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रियदर्शिनी चौकात सापळा रचला. संशयित वाहन येताच वाहन थांबवून पोलिसांची झडती घेतली असता तब्बल ६० पेट्या देशीदारूसाठा आढळून आला. दारूसाठा जप्त करण्यात आला असून, जप्त दारूसाठा आणि वाहन असा एकूण १२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी शंकर देवकर आणि प्रमोद पवार या दोघांना अटक करण्यात आली.

Leave a Comment