अहमदनगर प्रतिनिधी | संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर झालेल्या अपघातात सुमारे ६ जखमी झाले आहेत. चंदनापुरी घाटात गेल्या महिन्यात कोसळलेल्या दरडी काढण्याच काम अद्यापही सुरू असल्यामुळ महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. मात्र, यामुळे घाटात अपघातांचे प्रमाण वाढल आहे. त्यामुळंच हा अपघात झाला आहे.
दरम्यान चंदनापुरी घाटातील आनंदवाडी शिवारात नाशिकहून पुण्याकड निघालेल्या भरधाव कारने एका दुधाच्या टँकरला ओव्हर टेक करीत असताना समोरून येत असलेल्या स्विफ्ट कारला कारला जोराची धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की स्वीफ्ट कार थेट दुभाजकावर जाऊन आदळली. तर टाटा कार ओव्हर टेक करीत असलेल्या दुधाच्या टँकरच्या २ चाकांच्यामध्ये अडकली. या अपघातामुळे महार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळित झाली होती.
महामार्गावरील चंदनापुरी घाटातील दरडी अद्याप हटविलेल्या नाहीत. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. घाटातली दरडी हटविण्याचे काम तत्काळ पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.