पुणे प्रतिनिधी । राज्याला कोरोनानाने घातलेली मगरमिठी आणखी घट्ट होतांना दिसत आहे. एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. तर दुसरीकडे मृतांच्या संख्येत सुद्धा वाढ होताना दिसत आहे. त्यातच आज पुण्यातून अशीच एक चिंता वाढवणारी मिळत आहे. पुण्यात सकाळपासून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. नायडू रुग्णालय १, नोबेल रुग्णालय १ आणि ससून रुग्णालयात ३ असे एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील मृतांची संख्या आता १३ वर जाऊन पोहोचली आहे.
भारतात गेल्या २४ तासात करोनाचे ७७३ नवे रुग्ण आढळले असून ३५ मृत्यूंची नोंद झाली आहे. भारतातील करोनाबाधितांची संख्या ५१९४ वर पोहोचली आहेत. तर मृतांची संख्या १४९ झाली आहे. ४०१ जणांवर उपचार करुन त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. राज्यातील करोनाबाधितांचा आकड्यात वाढ होऊन त्यांची संख्या १ हजार ७८ वर पोहचली आहे. आज ६० नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यातील ४४ नवे रुग्ण बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात आढळले. तर ९ पुणे महापालिका क्षेत्रात, 4 नागपूर व अहमदनगर, अकोल व बुलडाणा येथे प्रत्येक एक जण आढळला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”