नवी दिल्ली । देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे १ जून ते १० जूनपर्यंत देशात ९० हजार नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाचे संकट अद्यापही टळले नसल्यामुळे नियमांचे पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोनापासून बरे होणाऱ्यांची संख्या कोरोना रुग्णांपेक्षा अधिक आहे. सध्या भारतात कोरोना रुग्णांची संख्या जवळपास २.८ लाखांवर पोहोचली आहे.
न्युज एजेन्सी पीटीआयने जाहीर केलेल्या अकडेवारीनुसार भारतात कोरोना रुग्णांची संख्या २ लाख ७७ लाख २८६ वर पोहोचली असून ८ हजार ९९ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामध्ये कोरोनाच्या विळख्यातून बाहेर येणाऱ्यांची संख्या १.४ लाख आहे. आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार देशात १ लाख ३३ हजार ६३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे आतापर्यंत १ लाख ३५ हजार २०६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. बुधवारी महाराष्ट्रात नवे ३ हजार २५४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे आता महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ९४ लाख ४१ वर पोहोचली आहे. शिवाय आतापर्यंत ३ हजार ३४३८ जणांनी आपले प्राण गमावले आहे. दिलासादायक बाब म्हणजे ४४ हजार ५०० रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in