चित्रपटासाठी थोडं थांबा..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंदेरी दुनिया । संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ या चित्रपटात अभिनेत्री अदिती राव हैदरी झळकली. या चित्रपटात तिनं अल्लाऊद्दीन खिलजीच्या पत्नीची भूमिका साकारली. भूमिका छोटी असूनही तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. त्यानंतर मात्र, ती जणू इंडस्ट्रीतून गायबच झाली.

सध्या तिनं हलक्या-फुलक्या भूमिका नाकारायचा सपाटाच लावला आहे. मोठं बॅनर आणि ए लिस्टर सहकलाकार असतील, तरच आपण चित्रपट करू, असं तिचं म्हणणं असल्याचं कळतंय. मुळे चित्रपटात पाहायचं असेल, तर थोडं थांबा असा सल्ला तिनं चाहत्यांना दिला आहे.

या आधी अदितीने भूमी,वझीर,मर्डर ३असे हिट सिनेमे दिले आहेत. तसेच साऊथ इंडस्ट्री मध्ये सुद्धा सिनेमे केली आहेत.

Leave a Comment