Tuesday, January 7, 2025

चेहऱ्यासाठी घरगुती पद्धतीने तयार करा केळीचे फेस पॅक ; होईल अशा प्रकारे जबरदस्त फायदा

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक मुलींना आपण सुंदर दिसावे असे वाटत असते. मुली वयात आल्यानंतर त्यांच्याकडून आपल्या चेहऱ्याची जास्त काळजी घेतली जाते. त्यासाठी त्या अनेक वेळा ऐकीव गीष्टींवर विश्वास ठेवतात. आणि त्या पद्धतींचा वापर आपल्या चेहऱ्यावर करतात. काडी कधी त्याचा फायदा होतो. पण कधी कधी त्याचे नुकसान हि सहन करावे लागते. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार घरामध्येच फेस मास्क तयार करा. घरगुती फेस मास्कमुळे त्वचेला भरपूर फायदे मिळतल. या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला सात घरगुती फेस्क मास्कची माहिती देणार आहोत.

कधीकधी रोजची धावपळ, घरातील, ऑफिसमधील कामांचा ताणतणाव इत्यादी कारणांमुळे त्वचेची देखभाल करणे अनेकांना शक्य होत नाही. यावर पर्याय म्हणून काही जण ब्युटी पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट करतात. पण या ट्रीटमेंटमुळे चेहऱ्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. खर्च आणि त्वचेचं नुकसान टाळण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नैसर्गिक उपचारांची मदत घ्यावी.नितळ आणि सुंदर त्वचेसाठी तुम्ही स्वयंपाकघरातील फळ आणि भाज्यांपासून वेगवेगळ्या प्रकारचे फेस मास्क तयार करू शकता.

अनेक वेळा चुकीच्या वापराचे परिणाम आपल्या चेहऱ्यावर होतात.वयात आले कि काही मुलींना याचा त्रास हा होतोच . त्यासाठी तर मग आपल्या ब्युटी केअर रुटीनमध्ये या फेस मास्कचा समावेश करावा. केळ्यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. हे घटक त्वचेवरील रोमछिद्र स्वच्छ करण्याचे काम करतात. हळदीतील औषधी गुणधर्मामुळे चेहऱ्यावरील मुरुम कमी होण्यास मदत मिळते. बेकिंग सोडा त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेण्याचे कार्य करते.

मुरुमांसाठी फेस मास्क

एक पिकलेले केळ घेऊन त्याचा बारीक किस करा. त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा टाका . थोडा वेळ ते संपूर्ण मिक्स होईपर्यंत ते सतत हलवत राहा. त्यामध्ये पुन्हा अर्धा चमचा हळद टाका . ते मिश्रण एकत्र करून त्याचा वापर फेस पॅक म्हणून रात्री झोपताना करा. काही महिने हि क्रिया सतत केल्याने आपल्या चेहऱ्यावरचे मुरूम कमी होण्यास मदत होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’