जळगावचा सिंघम आता अहमदनगरमध्ये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी | सुशिल थोरात

जळगावमधील व्हाईट कॉलर आणि गुंडागर्दी करणाऱ्यांचे कर्दनकाळ म्हणून ओळख निर्माण केलेले आयपीएस अधिकारी बी इशू सिंधू झाली यांची अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. शुक्रवारी अहमदनगरचे मावळते जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडून त्यांनी पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेतली.

रंजनकुमार शर्मा यांची कारकीर्दही नगर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली असून त्यांच्या कार्यकाळात अनेक गंभीर घटना होऊनही त्या घटनांचा तपास आणि आरोपींना अटक करण्यात पोलिस अधीक्षक आणि त्यांच्या टीमला यश आलं होतं.

इशू सिंधू हे कोणाच्याही दबावाला बळी न पडता काम करत असल्याचं ओळख असल्याने त्यांच्याकडूनही नगरकरांना मोठ्या अपेक्षा आहेत

Leave a Comment