नवी दिल्ली । पुलवामा हल्ल्यानंतर सुद्धा केंद्रानं काही धडा घेतलेला दिसत नसल्याचे सोशल मीडियावर एका व्हायरल झालेल्या विडिओवरून समोर आलं आहे. या व्हिडिओत काही जवान एका साध्या ट्रकमधून प्रवास करताना दिसत आहे. ‘नॉन बुलेटप्रुफ गाड्यांमधून पाठवून आमच्या जीवासोबत खेळलं जातंय’ असं हे जवान या व्हिडिओमध्ये सांगत आहेत.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करण्यात सातत्य राखत भारतीय सीमेवर तैनात जवानांचा मुद्दाही उचलून धरला आहे. यावेळी, राहुल गांधी यांनी जवानांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी ८४०० रुपये खर्चुन आलीशान विमान मागवलं जात आहे आणि जवानांना विना बुलेटप्रुफ ट्रकांमधून शहीद होण्यासाठी सीमेवर पाठवलं जात आहे, असं त्यांनी या व्हिडिओसोबत म्हटलं आहे.
आज (शनिवार) सोशल मीडियावर हा व्हिडिओ राहुल गांधी यांनी शेअर केलाय. या व्हिडिओत एका ट्रकमध्ये जवान बसलेले दिसत आहेत. ते एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. यामध्ये एक जवान म्हणताना दिसतोय की, ‘नॉन बुलेटप्रुफ गाड्यांमधून पाठवून आपल्या जीवासोबत खेळलं जातंय’.
सोशल मीडियावर जवानांचा व्हायरल झालेल्या हा व्हिडिओवरून राहुल गांधी यांनी मोदी सरकरावर टीकास्त्र सोडलं ‘आपल्या जवानांना नॉन बुलेटप्रुफ ट्रकांमधून शहीद होण्यासाठी पाठवलं जात आहे आणि पंतप्रधानांसाठी ८४०० कोटी रुपयांचं विमान मागवलं जात आहे, हा न्याय आहे का?’ असा सवाल राहुल गांधींनी विचारला आहे.
हमारे जवानों को नॉन-बुलेट प्रूफ़ ट्रकों में शहीद होने भेजा जा रहा है और PM के लिए 8400 करोड़ के हवाई जहाज़!
क्या यह न्याय है? pic.twitter.com/iu5iYWVBfE
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 10, 2020
गेल्या वर्षी पुलवामामध्ये जवानांच्या काफिल्यावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता. हे जवान जम्मूवरून काश्मीरकडे जात असताना वाटेत हा हल्ला झाला होता. या हल्ल्यात जवळपास ४० जवान शहीद झाले होते. दरम्यान, राहुल गांधी सतत चीन आणि भारत तणावाच्या पार्श्वभूमीवर जवानांना मिळणाऱ्या सुविधांना अधोरेखित करत आहेत, हा मुद्दा उचलून धरत आहेत. दोन दिवसांपूर्वीही राहुल गांधी यांनी ‘पंतप्रधानांनी आपल्यासाठी ८४०० कोटी रुपयांचं विमान खरेदी केलं. एवढ्या पैशांत तर सियाचिन लडाख सीमेवर तैनात आपल्या जवानांसाठी कितीतरी गोष्टी खरेदी करता आल्या असत्या. गरम कपडे ३० लाख, जॅकेट-ग्लोव्ह्ज ६० लाख, बुटं ६७ लाख २० हजार, ऑक्सिजन सिलिंडर १६ लाख ८० हजार… पंतप्रधानांना केवळ स्वत:च्या प्रतिमेची काळजी आहे सैनिकांची नाही’ असं ट्विट करत पंतप्रधानांवर आणि मोदी सरकारवर टीका केली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”