हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केळी म्हणजे शरीरासाठी सर्वात स्वस्त आणि मस्त फळ..असे म्हणतात की केळी खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो. मात्र केळी खाल्ल्याने वजन वाढत नाही तर आरोग्यास अनेक फायदे होतात. संशोधनातून हे समोर आले आहे की, दररोज तीन लहान केळी खाल्ल्याने जितकी एनर्जी मिळते तितकी 90 मिनिटे वर्कआउट केल्याने मिळते. मात्र केळ्यांनी केवळ एनर्जीच मिळत नाही तर तुम्ही फिट आणि हेल्दी राहता.
केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे….
दोन केळी खाल्ल्याने शरीराला पुढील ९० मिनिटांपर्यंत उर्जा मिळते. मैदानी खेळ खेळणाऱ्यांनी सरावातील ब्रेकदरम्यान केळी खाणे फायदेशीर ठरते.
अधिक तणाव जाणवत असल्यास केळी खावीत.
ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास अथवा तुम्ही लवकर थकत असाल तर केळ्यांचे सेवन करावे. केळ्यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो.
परीक्षा देण्यासाठी जात असाल तर जरुर केळे खा.
केळी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. केळ्यातील प्रोबायोटिक बॅक्टेरिया खाण्यातील कॅल्शियम शोषून घेते. यामुळे हाडे मजबूत होतात.
केळ्यांमध्ये पोषक तत्वांचा खजिना असतो. यात पोटॅशियम, फॉलिक अॅसिड, व्हिटामिन ए, बी, बी६, आर्यन, कॅल्शियम असते.
जुलाबाचा त्रास होत असल्यास केळे खाणे उत्तम.
केळ्याच्या नियमित सेवनाने चयापचयाची क्रिया सुरळीत राहते. तसेच कोलेस्ट्रॉल कमी राखण्यास मदत होते.
रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्याचे काम केळे करते.
अधिक मद्यपान केल्याने हँगओव्हर झाल्यास केळ्याचा शेक प्यायल्याने लवकर आराम मिळतो.
महिलांसाठी केळी खाणे गरजेचे त्यामुळे हाडे मजबूत होतात.