बीड, प्रतिनिधी, नितीन चव्हाण : माणुसकीला काळिमा फासणारी घटना बीड येथे घडली आहे. जिवंत असताना घराबाहेर पडल्यानंतर बीडमध्ये फिरून पोट भरले. नातेवाईक असतानाही अनाथ जीवन जगले. आता वृध्द झाल्याने 85 वर्षी मरण आले. पोलीसांनी नातेवाईकांना कळविले. चार दिवस उलटूनही अद्याप एकही नातेवाईक आलेला नसल्याने अंत्यसंस्कार रखडले असून मृतदेह शवागृहात ठेवला आहे. 85 वर्षीय जनाबाईने जिवंतपणी तर त्रास भोगलाच परंतू आता मृत्यूनंतरही यातना सहन कराव्या लागत आहे.
बीड शहरातील भाजी मंडई परिसरात 21 जानेवारी रोजी काही सामाजिक कार्यकर्त्यांना एक वृध्द आजी आजारी असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ त्यांना जिल्हा रुग्णालय बीड येथे दाखल केले. कार्यकर्ते आणि पोलीसांनी ओळख पटविली असता नाव जनाबाई आश्रुवा कागदे (रा.मोरगाव ता.जि. बीड) असल्याचे समजले. 24 जानेवारी रोजी दुपारी जनाबाईंनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालय चौकीतील पोलीसांनी नातेवाईकांना निरोप दिला. परंतू चार दिवस उलटले तरीही नातेवाईक आले असून नातेवाई असतांनाही जिवंतपणी अनाथाचे जिवन जगले अन मृत्यूनंतरही अंत्यसंस्कार रखडल्याने हि दुदैवी बाब आहे.