टीम हॅलो महाराष्ट्र | आपण गणपतीसाठी अनेक प्रकारचे मोदक बनवतो. पण ज्वारीच्या पीठाचेही मोदक बनवता येतात आणि ते खायला खूप स्वादिष्ट असतात. हे अनेकांना माहित नसते. त्यामुळे आपण गणपतीला नैवद्य म्हणून ज्वारीच्या पिठाचे नैवद्य कसे बनवायचे ते आपण आज जाणून घेणार आहोत.
साहित्य :
१) १ नारळाचे खोबरे
२) १ १/२ वाटी बारीक चिरलेला गूळ
३) ४ / ५ वेलदोडे
४) २ वाटया जोंधळ्याचे पीठ
५) मीठ व तूप
कृती :
१) अगोदर ज्वारी चांगली स्वच्छ धुवून, कपडयावर वाळवून घ्या.
२) नंतर ती गिरणीतून दळून आणा.
३) मैद्याच्या चाळणीने पीठ चाळून घ्या.
४) प्रथम नेहमीप्रमाणे नारळ आणि गुळाचे सारण तयार करून, शिजवून घ्यावे.
५) नेहमी मोदकाला घेतो, त्याप्रमाणे जितक्यास -तितके पाणी घ्यावे.
६) एका जाड बुडाच्या पातेल्यात पाणी घालून त्यात मीठ व तूप टाकावे.
७) पाण्याला उकळी येताच पातेले गॅसवरून खाली उतरवून त्यात पीठ घालावे व उलथन्याच्या टोकाने पीठ ढवळावे.
८) नंतर गॅसवर ठेवून दोन वाफा आल्यावर उतरवावे व मळून घ्यावे आणि नेहमीप्रमाणे मोदक करावेत.
हे पण वाचा –
गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांसाठी खुशखबर
बनवा बाप्पासाठी खोबऱ्याचे मोदक सोप्या आणि सध्या पद्धतीने
बाप्पाला नैवेद्य म्हणून ‘या’ सोप्या पद्धतीने बनवा ‘उकडीचे मोदक’