पालघर प्रतिनिधी । डहाणू व तलासरी तालुक्यातील गावे भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी पुन्हा एकदा हादरली. तलासरी, डहाणू परिसरांत भूकंपाचे सत्र सुरूच असून रात्री 4 वाजून 31 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. आणि पुन्हा एकदा परिसरातील गाव तीव्र धक्क्यांनी हादरली. मात्र यावर उपाययोजना करण्याबाबत शासन यंत्रणेची उदासीनता पाहता गावातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
डहाणू, तलासरी तालुक्यांतील अनेक गाव खेडी सध्या भूकंपाच्या दहशतीखाली आहेत. गेल्या नोव्हेंबरपासून रात्री-अपरात्री भूकंपाचे वारंवार धक्के बसत आहेत. पहाटे भूकंपाची मालिका सुरू झाली असून भूकंपाच्या धक्क्यान अनेक घरांना तडे बसून मोठ नुकसान झालय. परिसरातील भूकंपाबाबत प्रशासनाकडून नागरिकांमध्ये जागृती तसच सुरक्षा उपाययोजनांची माहिती दिली जातेय. परंतु वारंवार भूकंपाचे धक्के बसूनही त्यावर शासकीय यंत्रणा ढिम्मच असल्याच जाणवतंय. कारण वेळोवेळी होणाऱ्या भूकंपाच्या नोंदी ही संकेतस्थळावर नोंदविण्यात येत नसल्यान सेस्मॉमीटरमधील डेटा घेण्यात येतो की नाही, असा संशयही नागरिकात व्यक्त होत आहे.