पालघर प्रतिनिधी। नाणार प्रमाणे डहाणू तालुक्यात होणारे वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या वतीने ‘एकच जिद्द वाढवण बंदर रद्द’ च्या घोषणा देत आंदोलन करण्यात आले.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर या आंदोलनाला सुरुवात झाली असून या भागातील लोक रात्री रस्त्यावर उतरली आहेत. एकीकडे हे बंदर उभारणारच, असा सरकारचा अट्टाहास तर दुसरीकड सरकारच्या या निर्णया विरोधात प्राणपणान लढण्याचा भूमीपुत्राचा निर्धार, अशा वातावरणामुळे येणार्या काळात सरकार-भूमीपुत्र, असा संघर्ष उभा ठाकण्याची दाट शक्यता आहे.
स्थानिक भूमिपुत्र स्वतःच्या अस्तित्वाच्या, या लढाईत झोकून देण्याच्या तयारीला लागले आहेत. सन 1998 साली हे बंदर उभारण्याचे प्रयत्न झाले होते, परंतु स्थानिक भूमीपुत्रांच्या विरोधापुढ सरकारला तेव्हा माघार घ्यावी लागली होती. परंतु सरकार, आता हे बंदर कोणत्याही परिस्थितीत उभारायचेच, अशा निर्धारान मैदानात उतरलेत. त्यामुळे संघर्ष अटळ आहे, या लढाईचे यशापयश हे भूमीपुत्रांच्या एकजुटीवर अवलंबून आहे.