तरुणांचा रुबाब वाढवणारी ‘जावा ३००’ पुन्हा रस्त्यावर धावणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | पुन्हा एकदा तरुणांचा रुबाब वाढवायला येत आहे ‘जावा ३००’ बाईक. एक काळ गाजवणारी आणि १९ व्या दशकात २ सायलेंसरच्या आवाजाने तरुणांना मोहात पाडणारी ‘जावा ३००’ नव्या अवतारात पुन्हा रस्त्यावर धावताना दिसणार आहे.

महिंद्रा कंपनीने जावा कंपनीचे सर्वाधिकार ताब्यात घेतले असून, १५ नोव्हेंबरला ‘जावा ३००’ या बाईकचे अधिकृतरीत्या उद्घाटन करण्यात आले. क्लासिक लेजंड्स प्रा. ली. या बाईकचे निर्मिते आहे.

आठ नोव्हेंबर हा सिलिकॉन सिटी पुण्यात जागतिक जावा बाईक दिवस म्हणून साजरा करण्यात आला. बाईकच्या जुन्या भागांचे यानिमित्ताने एकत्रीकरण करुन हा दिवस साजरा करण्यात आला. या दिवशी एकूण २५० बाईक्सचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. या बाईकने आजही तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना भूरळ घातलेली दिसून येते. जावा मोटारसायकल जुन्या लुकसह नव्याने बाजारात येत आहे. ही बाईक दीड लाख रुपयांपासून बाजारात उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment