तर उदयनराजें विरोधात शिवसेनेकडून ‘हा’ उमेदवार सातारा लोकसभा लढणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राष्ट्रवादीचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे सातारा लोकसभा ची जागा रिक्त आहे. या जागेवर विधानसभा निवडणुकी सोबतच पोटनिवडणूक होणार आहे. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करून पुन्हा आपण ताकतीने निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा केली आहे.

यामुळे उदयनराजे विरुद्ध तगडा उमेदवार कोण याबाबत सर्वच विरोधी पक्षांची चाचपणी सुरू आहे. यातच भाजपा व शिवसेना युतीमध्ये बिघाडी होण्याची चिन्हे आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जर आदेश दिले तर उदयनराजें विरुद्ध लढण्याची तयारी पुरुषोत्तम जाधव यांनी केली आहे. पक्षप्रमुख जो आदेश देतील तो मी पाळणार असल्याचेही पुरुषोत्तम जाधव यांचे म्हणणे आहे.

उदयनराजे विरुद्ध यापूर्वी दोन वेळा लोकसभेची निवडणूक पुरुषोत्तम जाधव यांनी लढली आहे. एक वेळ पक्षातून व एक वेळ अपक्ष अशी निवडणूक त्यांनी लढविली होती. या दोन्ही लढतींमध्ये मोठे मतदान दुसऱ्या क्रमांकाचे मतदान पुरुषोत्तम जाधव यांना झाले आहे. यामुळे मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यामध्ये पुरुषोत्तम जाधव यांचा मोठा जनसंपर्क आहे.

हे पण वाचा –

म्हणून उदयनराजेंच्या प्रवेशाला पंतप्रधान उपस्थित राहिले नाहीत : मुख्यमंत्री

राष्ट्रवादीत मला काय मिळालं ठेंगा; उदयनराजे भोसलेंचा सवाल

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंची लढत “या” दिग्गज उमेदवारासोबत?

स्वार्थासाठी राजीनामा देणार्‍या उदयनराजेंकडून निवडणूकीचा खर्च वसूल करावा..

अवघ्या नऊ मिनिटात पिला तब्बल ‘४५ कप चहा’