थाईलंडमधील गुहेत अडकलेल्या फुटबाॅल पटूंना वाचवण्यासाठी महाराष्ट्रातून किर्लोस्करच्या अभियंतांची फौज बँकॉकला

thumbnail 1531234329085
thumbnail 1531234329085
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बँकॉक : उत्तर थायलंडमध्ये एका गुहेत फुटबाॅल पटूंची एक टीम अडकली होती. गुहेत अडकलेल्या १६ ते १८ वर्षाच्या मुलांना आणि २५ वर्षीय प्रशिक्षकांना बाहेर काढण्यासाठी गेले १० दिवस थायलंड सरकारकडून रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात येत होते. या बचाव कार्यात गुहेत असणार्या पाण्याचा अडथळा येत होता. गुहेतील पाणी उपसण्यासाठी योग्य क्षमतेचे पंप थायलंडकडे उपलब्ध नव्हते. थायलंडच्या परराष्ट्र उच्चायुक्ताने सुषमा स्वराज यांना पत्र लिहून मदत मागीतली होती. परराष्ट्र खात्याच्या निर्देशावरुन महाराष्ट्रातील किर्लोस्कर कंपनीचे अभियंते देशातील सर्वात जास्त आश्व क्षमतेच्या मोटारी घेऊन थायलंडला रवाना झाले. थायलंड मधील रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र धावून गेला आणि किर्लोस्करच्या अभियंत्यांनी त्या फुटबाॅल पटूंचे प्राण वाचवले.
किर्लोस्कर कंपनी ही महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील अग्रगण्य कंपनी आहे. शेतीची अवजारे यंत्रे बनवण्यासाठी या कंपनीची स्थापना झाली आहे.