Tuesday, January 7, 2025

दालचिनी आहे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ; चला जाणून घेऊ दालचिनीचे ‘हे’ जबरदस्त फायदे

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा स्वयंपाक घरात दालचिनी चा वापर आढळतो. परंतु त्याचा वापर जास्त प्रमाणात केला जात नाही. तरीही ती मसाल्याचा डब्यात असते. परंतु त्याचा उपयोग आणि त्याचे फायदे हे कोणत्याही गृहिणीला माहित नाहीत. कि त्या घरातील पुरुषांना सुद्धा माहित नाही. म्हणू आपण आज दालचिनीचे फायदे आणि त्याचा आहारात का समावेश केला जातो. हे पाहणार आहोत .

दालचिनीचे झाड सदाहरित आणि छोट्या झुडूपासारखे असते.पूर्ण वाढलेले झाड ६ ते १५ मी.उंचीचे असते.त्याच्या खोडाची साल निवडून घेऊन वाळवतात.त्यांचा आकार कौलासारखा गोल,जाड,मऊ आणि तांबूस रंगाचा असतो.दालचिनीची पैदास कोणत्याही प्रकारच्या जमिनीत होऊ शकत असल्याने अत्यंत सुपीक जमिनीपासून मुरुमाड, रेताड जमिनीत दालचिनी पिकते . दालचीनिला सुगंध असतो.यांचा वापर सर्वत्र मसाल्याचा पदार्थ आणि औषधी म्हणून करतात.याचे तेल ही काढले जाते.दालचिनीची पाने देखील ‘तेजपत्र‘ म्हणून मसाल्यात वापरतात.

दालचीनी चे फायदे–

दालचिनी चवीला तिखट-गोड असते. दालचिनी उष्ण, दीपन, पाचक, मुत्रल, कफनाशक, स्तंभक गुणधर्माची आहे.मनाची अस्वस्थता कमी करते.यकृताचे कार्य सुधारणा करते.स्मरणशक्ती वाढवते. दालचिनीचे उष्मांक मूल्य ३५५ आहे.

पचन विकार–
पचन सुधारण्यासाठी आणि पोटाचा गॅस कमी करण्यासाठी दालचिनीचे 3 विविध प्रयोग अपचन, पोटदुखी आणि अजीर्ण कमी होण्यासाठी दालचिनी, सुंठ, जिरे आणि वेलदोडे सम प्रमाणात घेऊन बारीक करून गरम पाण्यासोबत घ्यावे.दालचिनी, मिरीपूड आणि मध हे मिश्रण जेवणानंतर घेतल्यास पोट फुगत नाही.दालचिनीमुळे मळमळ, उलटी आणि जुलाब थांबतात.

स्त्रीरोग

अंगावरून जाणे, गर्भाशयाचे विकार आणि गनोरिया यावर दालचिनी उपयुक्त आहे.
प्रसुतीनंतर महिनाभर दालचिनीचा तुकडा चघळल्याने लवकर गर्भ धारणा होत नाही.
दालचिनीमुळे स्तनातील दुध वाढते.गर्भाशय संकोच होतो

सर्दीसाठी —
चिमुटभर दालचिनी पूड पाण्यात उकळून त्यात चिमुटभर मिरीपूड आणि मध टाकून घेतले असता, सर्दी, सुजलेला घसा आणि मलेरिया कमी होतो.

इतर उपयोग–

-थंडीमुळे डोके दुखत असेल तर दालचिनी पाण्यात वाटून लेप लावावा.

-मुख दुर्गंधी आणि दातासाठीच्या औषधांमध्ये दालचिनी वापरतात.

-मुरुमे जाण्यासाठी दालचिनीचे चूर्ण लिंबाच्या रसात मिसळून लावावे.

-गोवरप्रतिबंधक म्हणून दालचिनी वापरली जाते.

-दालचिनी,मिरीपूड आणि मध हे मिश्रण जेवणानंतर घेतल्यास पोट फुगत नाही.

-उष्ण प्रकृतीच्या व्यक्तींनी वैद्यकीय सल्ला घ्यावा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’