दिल्लीतील दंगल हे केंद्र सरकारचं अपयश – खा. अमोल कोल्हे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत सुरू असलेली दंगल हे केंद्र सरकारचं अपयश आहे. या घटनेची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खा. अमोल कोल्हे यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. पुणे महापालिकेत ते हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

चाकण एमआयडीसीचा विचार करता किमान डेमोस्टीक विमानतळ होणे गरजेचे असल्याचे मी यापूर्वीच संसदेत बोललो आहे. खेडचे विमानतळ दुदैवी धोरणामुळे आणि तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या भूमिकेमुळे गेले असल्याची टीकाही त्यांनी केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ‘नाशिक-पुणे’ रस्त्याचे काम आगामी दिड ते दोन वर्षात पुणे – नाशिक रस्त्याचे काम पूर्ण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुणे – नाशिक रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. खेड घाट बायपासचे कामपूर्ण होत आहे. याशिवाय इतर चार बायपासची निवीदा प्रक्रीया अंतिम टप्प्यात असून पावसाळ्यानंतर काम सुरू होईल असेही ते म्हणाले.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment