मुंबई | मराठा आरक्षणा संदर्भात आज मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सर्व पक्षीय बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत सर्व पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वपक्षीय नेत्यांनी या संदर्भात विशेष अशिवेशन घेण्याची मागणी केली असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सर्व पक्षांनी संमती दर्शविली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. तर अजित पवार यांनी “कोर्टात टीकेल असे मराठा आरक्षण देण्यात यावे तसेच भाजप नेत्यांनी मराठा समाजाच्या मोर्चांबाबतची बेताल वक्तव्य थांबवावीत” असे सुचित केले.
बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सभापती रामराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांतदादा पाटील, छगन भुजबळ, विनोद तावड़े, सुधीर मूनगंटीवार, दिवाकर रावते, रामदास कदम, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, शरद रणपिसे , अनिल परब , कपिल पाटील, शेकापचे जयंत पाटील आदी उपस्थित होते