अहमदनगर प्रतिनिधी। अहमदनगर जिल्ह्यातील दरेवाडी इथं एका महिलेचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे या महिलेची हत्या करून मारेकऱ्यांनी तिचा मृतदेह घरासमोरच पुरला. राजकन्या आगाशे असं मृत महिलेचं नाव आहे.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, राजकन्या आगाशे ही ४५ वर्षीय महिला दरेवाडी येथे शेत वस्तीवर राहत होती. या महिलेची काही अज्ञात गुन्हेगारांनी हत्या केली व नंतर महिलेचा मृतदेह तिच्या घरासमोरच पुरला. हा सर्व प्रकार काही नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळावरून पोलिसांनी पुरलेला मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठवला. मात्र या महिलेची हत्या कोणी व हत्येमागचे नेमके कारण काय याबाबत पोलीस तपास करत आहेत. या घटनेची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमा झाली होती. तसेच या निर्घृण हत्येनंतर परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.