धारावीत करोनाचा चौथा रुग्ण, मुंबईसाठी धोक्याचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । धारावीत करोनाचा चौथा रुग्ण आढळल्याने मुंबईसाठी धोक्याचा इशारा मानला जातो हे. धारवी येथील बलिगा नगरमध्ये आणखी एक रुग्ण आढळला आहे. एका ३० वर्षीय महिलेला करोनाची लागण झाल्याचं कळतं आहे. आतापर्यंत धारावीत ४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दिल्लीच्या मरकजसाठी गेलेले ५ जण धारावीत गेले होते. ते पाचही जण धारावीत राहिले होते. ज्याच्या फ्लॅटमध्ये हे लोक राहिले त्याचाही करोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या संपूर्ण धारावी परिसर कोरोनाच्या छायेत आहे. प्रशासनाने संपूर्ण परिसर सील केला आहे. अनेकांची तपासणी केली जात आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावी परिसर ओळखला जातो. अतिशय दाटीच्या या परिसरात मुंबईतील कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर राहतो. धारावीची लोकसंख्या पाहता येथे कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर मुंबईच्या चिंता वाढली आहे.

तर दुसरीकडं आज शिवाजी पार्क परिसरात करोनाचा पहिला रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी राहणऱ्या ६० वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५३७ वर पोहोचली आहे. यापैकी २८ मुंबईतील, १५ ठाण्यातील, दोन पुण्यातील, तर अमरावती व पिंपरी चिंचवडमधील प्रत्येकी एक आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

चिंता वाढली! देशातील करोनाग्रस्तांचा आकडा २९०० पार, ६८ जणांचा मृत्यू

अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार, २४ तासात १४८० जणांचा मृत्यू

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

राज्यातील लॉकडाउन काही आठवडे आणखी लांबणार?; राजेश टोपेंनी दिले संकेत

मरकजच्या लोकांना गोळ्या घातल्या पाहिजे, उपचार कसले करता – राज ठाकरे