धुळे हत्याकांडाला जबाबदार कोण?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम HELLO महाराष्ट्र : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावात जमावाने केलेल्या मारहाणीत रविवारी पाच जणांचा मृत्यू झाला होता. लहान मुलांचे अपहरण करत असल्याच्या संशयावरुन जमावाने पाच जणांना बेदम मारहान केली होती. पोलीस घटनास्थळी उपस्थित असूनसुद्धा ते जमावाला रोखू शकले नाहीत. या घटनेने संपुर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे. या धुळे हत्याकांडाला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. हत्या करणारा जमाव, परिस्थितीवर ताबा न मिळवू शकलेले पोलीस प्रशासन, सोशल मिडियावर अफवा पसरवणारे बिनडोक लोक की बेजबाबदार सरकार? तसे पाहीले तर केवळ शंकेतून मारहान करुन त्या पाच जणांचा जीव घेणारा जमाव प्राथमिकदृष्ट्या दोषी आहे. त्याचसोबत अफवांचे बीज पेरणारेही या घटनेला जबाबदार आहेत. घटनास्थळी दाखल असलेले पण काहीच करु न शकलेले पोलीसही तितकेच दोषी आहेत. अशा घटनांचे पेव सुटलेले असताना आणि राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले असताना गृहखात्याला स्वतंत्र मंत्री नसणे हे पण यामागील एक कारण आहे. त्यामुळे यात सरकारलाही दोषी ठरवायला हवे.

सोशल मिडियावर अफवा पसरवणारे –
लहान मुले पळवणारी एक टोळी पंचक्रोशीत सक्रीया असल्याची अफवा सोशल मिडीयातून पसरली होती. व्हाॅट्सअॅप, फेसबुक अशा सोशल मिडियावर आलेली माहितीची विश्वासार्हता न पडताळता ती तशीच पुढे पाठवण्याने अफवेला आणखीनच खतपाणी मिळाले. शिवाय मेडिया लाईव्ह नावाच्या स्थानिक न्युजपोर्टलने लहान मुले पळवणारी टोळी पंचक्रोशीत सक्रीया असल्याची बातमी केल्याने ती चांगलीच व्हायरल झाली. अफवा वार्यासारखी कमी कालावधीत अनेकांपर्यंत गावोगावी पोहोचली. त्यामुळे साक्री तालुक्यात खबराटीचे वातावरण तयार झाले होते. गावागावातील लोक अशा टोळीवर नजर ठेवून होते. अनोळखी आणि परक्या माणसांबद्दल संशय व्यक्त केला हात होता. यातूनच रविवारी राईनपाडाच्या बाजारात भिक्षा मागायला आलेल्या पाच जणांवर संशय घेतला गेला.

जमाव –
राईनपाडा गावचा बाजार असल्याने रविवारी आसपासच्या गावचे शेकडो लोक बाजाराला आले होते. बघता बघता त्या पाच जणांभोवती बघ्यांची गर्दी गोळा झाली. साक्रीत बोलली जाणारी अहिराणी मुळच्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याच्या असलेल्या त्या पाच जणांना समजत नव्हती. गोसावी समाजातील त्या पाच जणांची भाषा जमावाला लक्षात येत नव्हती. यातून जमावाचा संशय आणखीनच बळावला आणि गर्दीतील लोकांनी त्या पाच जणांना बेदम मारहान करण्यास सुरवात केली. पुढे गावचे सरपंच व पोलीस पाटील घटनास्थळी आले तरी जमावाची मारहान चालुच होती. शेवटी रक्तबंबाळ झालेल्या त्या पाच जणांना ग्रामपंचायतच्या इमारतीत हलवण्यात आले. परंतु चिडलेला जमाव तेथीही आला आणि दरवाजा खिडक्या मोडून आतमधे शिरला आणि पुन्हा मारहान सुरु झाली. अशात पोलीस तिथे दाखल झाले. परंतु जमावाने पोलीसांना न जुमानता मारहान सुरुच ठेवली. काहींनी पोलींसांनाही मारहान केली. रक्तबंबाळ होऊन विव्हळणार्या त्यांना जमावाने निर्दयपणे मारहान केक्याने त्या पाच जणांचा मृत्यु झाला. इथे जमावाने कायदा हातात घ्यायला नको होता. पोलीसांशी संपर्क न करता लोकांनी थेट कायदा हातात घेऊन मारहान करणे चुकीचे आहे.

पोलीस प्रशासन –
योग्य वेळी घटनास्थळी दाखल होऊनसुद्धा पोलीसांना परिस्थिती आटोक्यात आणता आली नाही. पोलीसांनदेखत सारे घडत असताना त्यांना बघ्याची भुमिका बजावावी लागली. कायदा व सुव्यवस्था राखणे पोलीस प्रशासनाचे काम आहे. परंतु साक्री तालुक्यातील घटनेत पोलीस प्रशासन सपशेल फेल गेले. संतप्त जमावाने पोलीसांना न जुमानता कायदा हातात घेतला.

सरकारचा बेजबाबदारपणा –
अशा घटनांचे पेव सुटलेले असतानासुद्धा सरकारतर्फे त्यावर कोणतीच उपाययोजना केली जात नाहीये. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत. तरीही गृहखात्याला स्वतंत्र मंत्री देण्यात आलेला नाही. गृहखात्याला स्वतंत्र मंत्री नसल्यामुळे पोलीस प्रशासनावर कोणाचाच वचक राहीलेला नाही.

Leave a Comment