मुंबई : काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांचा समावेश उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात केल्याने भाजपकडून शिवसेनेवर जोरदार टीका होत आहे. देशद्रोही अस्लम शेख आता देशभक्त झाले, अशी टिका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज केली आहे. भाजपच्या या टीकेला स्वतः मंत्री अस्लम शेख यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नथुराम गोडसेंच मंदिर बांधणाऱ्यांकडून अजून काय अपेक्षा करणार? अशी टीका मंत्री अस्लम शेख यांनी केली आहे.
त्यांनी म्हंटले की, भाजपचा जन्म या देशाचा सत्यानाश करण्यासाठी झाला आहे. महात्मा गांधी यांना मारणारे आणि नथुराम गोडसेचं मंदिर बांधणारे हे लोक आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार?, आम्ही त्यांना योग्य उत्तर देत राहू,’ आमदार अस्लम शेख यांनी २०१५ साली याकूब मेमनची फाशीची शिक्षा कमी करण्याची मागणी केली होती. विधानसभा अधिवेशनात देखील त्यांनी ही मागणी केली होती. त्यावेळेस भाजप आणि शिवसेनेने सभागृहाचे कामकाज बंद पाडले होते.