मुंबई : कोकणातील राजापूर येथे होऊ घातलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिवसेनेवर घणाघाती आरोप केले आहेत. शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी एका सभेत नाणार प्रकल्पाचे नोटीफिकेशन रद्द केले असल्याचे सांगीतले होते मग तरी नाणार प्रकल्पाचा करार कसा काय झाला असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार येथील सभेत नाणार प्रकल्प रद्द केला असल्याची घोषणा केली होती. परंतु दोनच दिवसांपुर्वी भाजपचे केंन्द्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सरकारने नाणार प्रकल्पाबाबत गल्फच्या पेट्रोलियम कंपनीसोबत ३ लाख कोटीचा करार केला असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे शिवसेना नाणारप्रकल्पाबाबत घेतलेल्या भुमिकेसंदर्भात तोंडावर पडली आहे. उद्योगमंत्री देसाई यांनी प्रकल्पाचे नोटीफिकेशन रद्द केल्याचे सांगितले असताना प्रकल्पाबाबतचा करार झालाच कसा असा सवाल मलिक यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.