नानार प्रकल्पाच्या विरोधावर शिवसेना ठाम, प्रचंड गदारोळात विधानसभा दिवसभरासाठी तहकूब.

thumbnail 1531472777537
thumbnail 1531472777537
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर | नानार तेलशुद्धीकरण प्रकल्प कोकणात होऊ नये यासाठी कॉग्रेस,राष्ट्रवादी सहित शिवसेनेने दंड थोपटल्याने भाजपा एकटी पडली आहे. शिवसेना नानार प्रकल्पाच्या विरोधावर ठाम राहीली आहे. नानार प्रकल्पावरुन विधानसभेत प्रचंड गदारोळ होऊन विधानसभेचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. नानार प्रकल्पावरुन विधिमंडळाचे कामकाज ठप्प पडण्याचा आज तिसरा दिवस आहे.

‘कुणावर ही अन्याय अथवा बळजबरी केली जाणार नाही. सर्वाना विश्वासात घेतल्यावरच प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येईल’ असे मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी नानार प्रकल्पासंदर्भात विधानसभेत निवेदन दिताना म्हटले आहे. मात्र भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने यावेळी नानार प्रकल्पाच्या सरकारच्या भुमिकेला पाठिंबा दिला नाही. शिवसेनेचे नेते अनिल प्रभु यांनी सभागृहात भाजपच्या विरोधात जोरदार भाषण केले. तसेच ‘नानार प्रकल्पाची जमीन अधिग्रहण करण्यात घोटाळा होत आह’ असा सणसणीत आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केला. त्यामुळे सभागृहात एकच गदारोळ माजला. सभागृहात माजलेला गोंधळ पाहता विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधानसभेचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब केले.