नालासोपारर्‍यात रेल्वे रुळावर साचलेल्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | वसई-विरार मध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे काल ट्रेन बंद झाल्याने रेल्वे रूळावरून चालत येत असताना एका युवकाचा पाण्यात अचानक बसून दुर्दैवी मृत्यू झाला. मयत युवकाचे शव काल वसंत नगरी येथे सापडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  मनीष सिंह (वय ३६) अशी मयत युवकाची ओळख पटली असून तो नालासोपारा पूर्वेकडील अलकापुरी मध्ये आपल्या कुटुंबीयांसह राहत होता.

काल शुक्रवारी एक युवक वसई रेलवे स्टेशनहून नालासोपारा स्टेशन रेलवे ट्रेक पकडून जात असताना अचानक पाय घसरून नाल्यात पडून मृत्यू झाल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मनीषचा मृतदेह वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने बाहेर काढला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून ओळख पटवून शवविच्छेदनासाठी पाठविले. मृतक मनीषच्या नातेवाईकांशी असता मनीष मुंबईतील अंतरराज्यीय एयरपोर्ट जवळ सहारा पेट्रोल पंपावर काम करीत होता. काल शुक्रवारी संध्याकाळी घरी येताना मनीष वसईला होता. नालासोपाऱ्यात पाणी साचले असल्याने ट्रेन बंद असून मी चालत येत असल्याचे मनीषने त्याच्या पत्नीला सांगितले होते. मात्र अर्ध्या तासानंतर त्याचा फोन स्वीच ऑफ झाल्याने मनीष बेपत्ता झाल्याची तक्रार वसई रोड लोहमार्ग पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी दाखल केली होती.

Leave a Comment