नेत्र तपासणीत अपात्र ठरलेल्या एसटी चालकावर उपासमारीची पाळी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलढाणा प्रतिनिधी | राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागातील काही चालकांनी वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून खोट रातांधळेपणाच प्रमाणपत्र घेऊन सुरक्षारक्षक पदी पर्यायी नेमणूक करून घेत महामंडळाची फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन डॉक्टरांसह एसटी महामंडळाच्या चालकांविरुद्ध पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या सर्व प्रकरणात एका खरोखर रातांधळेपणा असलेल्या चालकाला एसटी महामंडळाने इतर जागांवर सामावून न घेता मागील २९ महिन्यांपासून पगार न देता त्यांचे लायसन्स ही रद्द केलं आहे. चालकाच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आल्यान या चालकान आपल्या कुटुंबासह एसटी महामंडळाच्या बुलडाणा येथील विभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.

जळगाव जामोद एसटी आगारातील चालक सिद्धार्थ गवई २ वर्षांपूर्वी पर्यंत हे एसटी महामंडळाच्या जळगाव जामोद आगारात चालक पदावर कार्यरत होते. ८ वर्ष त्यांनी नोकरी यशस्वीरीत्या पार पाडली. मात्र २ वर्षांपूर्वी एसटी महामंडळान चालत गवळी यांना आपल्या डोळ्यांची तपासणी करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार त्यांनी एसटी महामंडळान नियुक्त केलेल्या डॉक्टर जवळ डोळ्यांची तपासणी केली या तपासणीमध्ये गवळी यांना रातांधळेपणा असल्याच समोर आल.

त्या दिवशीपासून गवळी यांना चालक पदाची जबाबदारी आगारातून देण्यात आली नाही. एसटी महामंडळान यानंतर गवळी यांना नियमानुसार आगारातील इतर पदांवर नियुक्त करण आवश्यक असताना त्यांना कुठेही जबाबदारी देण्यात आली नाही. शिवाय मागील २ वर्षापासून पगारही दिला नाही. त्यावर भरीस भर म्हणून आता एसटी महामंडळान आरटीओ विभागाकड पत्र देऊन गवळी यांचा लायसन्स म्हणजेच वाहन चालवण्याचा परवाना रद्द करून घेतला. त्यामुळ गवळी यांच्यावर आता उपासमारीची पाळी आली आहे. याबाबत अनेक वेळा महामंडळाकड तक्रारी व अर्ज निवेदन देऊनही ही कुठलाही परिणाम झाला नसल्यान शेवटी एसटी महामंडळाच्या बुलढाणा येथील विभागीय कार्यालयासमोर सिद्धार्थ गवळी यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत आमरण उपोषणास प्रारंभ केला.

Leave a Comment