नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी देशातच नव्हे तर परदेशात देखील निदर्शन होत आहे. जर्मनीतील एका टीव्ही वाहिनीने हुकूमशहा हिटलरशी पंतप्रधान मोदींची तुलना करणारे एक पोस्टर दाखवले. त्या कार्यक्रमाचा एक फोटो ट्विटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आला होता. हे ट्विट पाकिस्तानच्या आसिफ गफूर यांनी त्यांच्या ट्विटर हेडरवरून पुन्हा ट्विट केले आहे.
या ट्विटला उत्तर देताना पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने त्याचे मत व्यक्त केले. तो म्हणाला की, पंतप्रधानांनी घेतलेले निर्णय योग्य नाहीत आणि त्यांनी ते बदलले पाहिजेत. आफ्रिदीने लिहिले, “अगदी बरोबर म्हणाले बॉस, मोदींचा काळ संपत आहे. हिंदुत्वावर आधारित त्यांच्या विचारधारेचा विरोध केला जात आहे. त्यांनी जम्मू काश्मीर आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंबंधी घेतलेले निर्णय परत घेतले पाहिजेत. जर त्यांनी हे निर्णय मागे घेतले नाही तर नरेंद्र मोदी आपल्या नियतीच्या दिशेने खूप वेगवान वाटचाल करीत आहे.”
सीएबी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून भारतात खळबळ उडाली आहे. याचा निषेध म्हणून ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. या निर्णयाबद्दल लोकांमध्ये रोष आहे आणि ते आपला विरोध व्यक्त करण्यासाठी आंदोलन करत आहेत.