बारामती : उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू आज बारामती दौर्यावर आले आहेत. शरद पवारांच्या बारामतीमधे नायडू यांना पाहून अनेकांच्या भुवया उंचावत आहेत. “पक्ष वेगळे असले तरी पवारांबरोबरचा स्नेह चाळीस वर्षांचा आहे” असे वैकय्या नायडू यांनी बारामतीत बोलताना म्हटले आहे. ‘बारामतीचा विकास पाहण्याची माझीच ईच्छा होती’ असेही नायडू म्हणाले आहेत.
आज सकाळी ९ वाजता नायडु यांचे बारामतीमधे आगमन झाले. त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरिश बापट, अजित पवार व सुप्रिया सुळे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर नायडू यांनी माळेगाव येथील कृषी विज्ञान केंन्द्रातील विविध प्रकल्पांना भेटी दिल्या. माजी केंन्द्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी शेतीमधील नविन तंत्रज्ञानाबद्दल नायडू यांना माहीती दिली. बारामती येथील विद्याप्रतिष्ठान महाविद्यालयातील शरद पवारांच्या वस्तुसंग्रहालयाला भेट दिल्यानंतर नायडू यांनी पवार यांच्या माळेगाव येथील घरी सहभोजन केले. बारामतीचा दौरा आटपुन दुपारी वैकय्या नायडू विशेष विमानाने पुण्याकडे रवाना होणार असल्याचे समजत आहे.