पहिल्या इलेक्ट्रिक एसटी बसचे लोकार्पण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था |इलेक्ट्रिकवर चालणारी पहिली एसटी बस मुंबईत दाखल झाली आहे. ‘शिवाई’ असं या बसचं नामकरण करण्यात आलं असून ही बस दादर ते पुणे दरम्यान धावणार आहे. विजेवर चालणाऱ्या या पर्यावरण पूरक बसमुळे एसटी महामंडळाच्या खर्चात बचत होणार आहे. विजेवर चालणाऱ्या या बसचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.

इंधन दरवाढीमुळे होणारा खर्च टाळण्यासाठी विजेवर चालणारी बस घेण्याचा निर्णय एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतला होता. त्यानुसार ही बस घेण्यात आली आहे. विजेवर चालणाऱ्या अशा एकूण १५० बसेस खरेदी करण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.

या बसची आसन क्षमता ४४ इतकी आहे. ही बस वातानुकुलीत असून चार्ज केल्यानंतर ३०० किमीपर्यंतचा पल्ला गाठण्याची क्षमता या बसची आहे. शिवाय बस चार्ज होण्यासाठी १ ते ५ तासांचा कालावधी लागणार आहे. या बसचा खर्च शिवशाही बसपेक्षा अधिक आणि शिवनेरीपेक्षा कमी असणार असून या इलेक्ट्रिक बसमुळे प्रदुषणात घट होणार आहे.

Leave a Comment