टीम HELLO महाराष्ट्र | सध्या पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुका ज्या मुद्द्यावर लढल्या जात होत्या त्या काश्मीरच्या मुद्दयाला कोणत्याच राजकीय पक्षाने शिवण्याचे धाडस या निवडणुकीत केलेले नाही. कारण देश सध्या गरिबी आणि आर्थिक चनचणीतून बाहेर निघत नसताना काश्मीरच्या मुद्दयावर निवडणूका लढवल्यावर रोगापेक्षा इलाज भयंकर होईल हे पाकिस्तानी नेत्यांना चांगलेच ठाऊक आहे. तसेच काही कट्टरवादी सोडले तर इतर पाकिस्तानवासीयांना काश्मीर मुद्द्याबाबत कसलाच रस नाही.
पाकिस्तानात ‘पाकिस्तान मुस्लिम लीग’ (नवाज) म्हणजे पीएमएल-एन, पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआई) आणि पाकिस्तान पिपल्स पार्टी (पीपीपी) हे तीन प्रमुख राष्ट्रीय राजकीय पक्ष आहेत. पीटीआई हा पूर्व क्रिकेटपटू इमरान खान यांचा पक्ष. त्या पक्षाच्या जाहीरनाम्यात कश्मीर मुद्दयाचा उल्लेख नाममात्र केला असून त्यात त्यांनी म्हटले आहे की आमच्या पक्षाला कश्मीरचा मसला संयुक्त राष्ट्र संघाच्या चौकटीत राहूनच सोडवायचा आहे. संयुक्त राष्ट्र संघाशी वाटघाटी करून काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करण्याचे जाहीरनाम्यात म्हटले आहे. त्यातील पीएमएल-एन हा नवाज शरीफ यांचा पक्ष असून तो पाकिस्तान मधील सर्वात मोठा पक्ष आहे त्यांच्या जाहीनाम्यात चीन सोबत संबंध सुधारण्यावर भर दिला असून पाकिस्तानच्या परमाणू रक्षणाला महत्व दिले आहे. परराष्ट्र धोरणात काश्मीरचा मुद्दा नवव्या स्थानी असून त्यात फक्त दगडमरी करणाऱ्या कश्मिरी नागरिकांच्या बद्दल सहानभूती दर्शवली आहे.
भारता संबंधित चांगला उल्लेख फक्त पाकिस्तान पिपल्स पार्टी (पीपीपी) या पक्षाच्या जाहीर नाम्यात आढळतो. पी पी पी पक्ष हा पाकिस्तानच्या पूर्वपंतप्रधान बेनजीर भुट्टो यांचा आहे.बेनजीर भुट्टो पंतप्रधान असनाताना भरतासोबत त्यांचे सलोख्याचे संबंध होते. परंतु २००७साली त्यांची रावपिंडीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पीपीपी या पक्षाच्या जाहीरनाम्यात मात्र स्पष्ट शब्दात असा उल्लेख आहे की जर आम्ही सत्तेत आलो तर भारता सोबत आम्ही संबंध सुधारू आणि दोन्ही देशातील सीमेवरील वातावरण निवळण्यासाठी प्रयत्न करू.
सुरज शेंडगे