पाकिस्तानने राष्ट्रपती कोविंद यांना हवाई प्रवेश नाकारला

0
25
संग्रहीत छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था | राष्ट्रपती रामनाथ कोविंद सोमवारपासून आइसलँड, स्वित्झर्लंड आणि स्लोव्हेनियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, पाकिस्ताननं कोविंद यांच्या विमानाला हवाई हद्दीतून प्रवेश देण्यास नकार दिला. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी यासंदर्भात माहिती दिली. राष्ट्रपती कोविंद हे सोमवारपासून १७ सप्टेंबरपर्यंत आइसलँड, स्वित्झर्लंड आणि स्लोव्हेनियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

कोविंद यांचे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाऊ द्यावे, अशी परवानगी भारतानं मागितली होती. पण पाकिस्तानने ती नाकारली, असं कुरेशी यांनी सांगितलं. या निर्णयाशी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे देखील सहमत आहेत. काश्मीरमधील तणावपूर्ण स्थितीमुळं हा निर्णय घेण्यात आला आहे, असंही ते म्हणाले.

भारतीय हवाई दलानं बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक करून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्ताननं त्यांची हवाई हद्द भारतीय विमानांसाठी पूर्णपणे बंद केली होती. मार्चमध्ये त्यांनी अंशतः हवाई हद्द खुली केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा भारतीय विमानांसाठी हवाई हद्द बंद केली आहे. पाकिस्तान कलम ३७० रद्द केल्यापासून विचित्र कारवाया आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here