हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाचगणी येथे धनदांडग्या कडून दलित कुटुंबाच्या घरावर बुलडोजर फिरवल्याची आणि जमिनीवर कब्जा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर दलित व्यक्तीचे नाव अशोक बाबूराव कांबळे असून त्यांनी असे म्हणले आहे की त्यांचा पाचगणी शहरातील फायनल फ्लॅट नंबर1 मध्ये असणारे सध्याचे फायनल प्लॉट नंबर 76 अ आणि ब मध्ये पारशी कुटुंबाच्या साडेपाच एकर जमिनीमध्ये त्यांचे महार वतनाचे संरक्षित कुल लागलेले आहे.पाचगणीत धनदाडग्याच्या मुजोरीमुळे कायदा व सुव्यवस्था कोठे गेली ? असा प्रश्न सर्वसामान्यानकडुन होत आहे.
एकोणिसाव्या शतकात हे पारशी लोक पाचगणी सोडून मुंबईला राहायला आले. आणि त्यांच्या आज्जीला आणि आई वडीलांना पाचगणी मधेच केअर टेकर म्हणजेच माळी म्हणून ठेवून घेतले. परंतु नंतर त्यांनी मुंबईचा पत्ता न देता तसेच कोणताही पगार न देता त्यांना त्या ठिकाणी सोडून दिले. त्यानंतर ते सर्व शेती करू लागले.
त्यांनतर ते साडेपाच एक्कर जमीनिची शेती करू लागले. पारशी लोकांची विहीर असल्याने शेती करताना कोणतीही अडचण आली नाही. ते स्वतः 1971 -72 ला कॉलेज संपल्यानंतर पाचगणी सोडल्यानंतर काही गावगुंडांनी जमिनीची कागदपत्रे बदली करण्यास सुरुवात केली. भिलारे गुरुजींचा नातलग किसन भिलारे व त्यांचा पार्टनर मधुकर सावंत यांनि महाबळेश्वर तहसील येथून कागदपत्रांचा फेरबदल करून काही कागदपत्रे गायब केली.
ते पुढे म्हणाले , “माझे महारवतनाचे काही जुनी कागदपत्रे माज्याकडे आहेत परंतु मी स्वतः महाबळेश्वरला अर्ज केला असता मला तुमची कोणतीही दफ्तरी कागदपत्रे उपलब्ध नसल्याने तुमचा अर्ज निकाली काढण्यात आला आहे.असे तहसील कार्यालयातुन लेखी देण्यात आले आहे”. तसेच 2 दिवसांपूर्वी वाईतील काही गावगुंड हाताशी धरून महात्मा फुले शाळेचे प्रिन्सिपल श्री गाडे यांनी त्यांच्या घरावरती बुलडोझर फिरवला अस ते म्हणाले.