अमरावती प्रतिनिधी| वेधशाळेन वर्तविलेल्या अंदाजानुसार संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झालीये. अमरावती जिल्यातील धारणी तालुक्यात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली असून परिसरातील नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे.
गडगा, सिपना, खापरा, खंडू आणि दुणी गावाजवळील अलाई नाला ओसंडून वाहतोय. सुरू असलेल्या संततधार पावसामुळ या मार्गावरील नदी-नाल्यांना पूर आला आहे. वाहतूक ठप्प झाल्यान नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून अनेक वाहने अर्ध्या रस्त्यातून परत जात आहेत. संततधार झालेल्या पावसान जनजीवन अस्ताव्यस्त झाल आहे.
गणपतीमध्ये सर्व रस्त्यांवर गर्दी आहे. नागरिक आपल्या नोकरीच्या ठिकाणाहून आपल्या घरी जात आहेत. मात्र पावसामुळं नद्यांना पूर आलाय. त्यामुळं नागरिक गणेशोत्सवासाठी आपल्या घरी जाऊ शकत नसल्यानं त्यांच्यामध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाल आहे.