पीएमसी बँकला कायमचे टाळे लागणार?

संग्रहित छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी। पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी बँक) बँक आर्थिक डबघाईला आल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पीएमसी बँकेवर निर्बंध लादले असून सर्व व्यवहार बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. रिझर्व्ह या आदेशनानंतर बँकेला कायमचे टाळे लागण्याची परिस्थिती वेळ आली आहे. बँक आर्थिक डबघाईला आल्यामुळेच आरबीआयने हा निर्णय घेतला असून, या निर्णयाने खातेदारांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. बँक टाळे ठोकण्याच्या तयारीत असल्याचे समजताच अनेक खातेदार बँकेत जमले असून  बँकेतील कर्मचाऱ्यांसोबत त्यांचे वाद सुरु झाले आहेत.

बँकिंग रेग्युलेशन कायदा ३५ अ नुसार बॅंकेचे सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश आरबीआयने  पीएमसीला दिले असून  हे निर्बंध सहा महिन्यासाठी लागू असणार आहेत. त्यानंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहेत.या नियमा अंतर्गत कोणताही ठेवीदार आपले बचत खाते, चालू खाते किंवा इतर कोणत्याही जमा खात्यातून एक हजाराहून अधिक रक्कम काढू शकत नाही.

तसेच पीएमसी बॅंकेला रिझर्व्ह बँकेच्या परवानगी शिवाय नवे कर्जही देता याणार नाही. सोबतच कुठल्याच ठेवीही स्विकारता येणार नाही आहेत. अशा परिस्थितीत खातेदार गोंधळून गेले असल्याने आता काय करायचे हा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाला आहे.