जळगाव प्रतिनिधी | जामनेर तालुक्यातील पहूर जवळील लोंढरी- शेंगोळा इथं खराब रस्त्यामुळ साईड पट्टीवरून पेट्रोल टँकर पलटी झाल्यान त्या टॅंकरमधून मोठ्या प्रमाणावर पेट्रोल गळती सुरू झाली. टँकरमधून पेट्रोल पडत असल्याच पाहून स्थानिकांनी पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की जामनेर तालुक्यातील पहूर जवळील लोंढरी-शेंगाळा इथं पेट्रोल घेऊन चाललेला टँकर अचानक पलटी झाल्यानं इथं खूप जास्त प्रमाणात पेट्रोल गळती सुरु झाली होती. लोंढरी-शेंगाळा इथं रस्ता खूप खराब असल्यानं इथं टँकर आदळल्यामुळं पेट्रोल गळती होत असल्याचं नागरिकांनी सांगितलं.
घटनास्थळी पोलीस खूप उशिराने दाखल झाल्यानं परिसरातील अनेक नागरिकांनी या ठिकाणाहून पेट्रोल वाहून नेलं. त्यामुळं इथं पेट्रोल गळती झाल्यामुळं येथील स्थानिक नागरिकांची चांगलीच चांदी झालीआहे .




