सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
लोकसभा निवडणुकी वेळी शिवेंद्रराजे भोसले आणि सातारा लोकसभेचे उमेदवार नरेंन्द्र पाटील यांच्या एकत्र मिसळ खाण्याने अनेकांना मिसळीचा ठसका बसला होता. आता पुन्हा एकदा फ्रेंडशीप डे दिवशी शिवेंद्रराजे आणि नरेंन्द्र पाटील एकत्र चहा पिताना दिसल्याने हा चहा किती जणांच्या तोंडाची चव कडू करणार अशी चर्चा जिल्ह्यात सुरु आहे.
आमदार शिवेंद्रराजे भोसले व आमदारनरेंद्र पाटील यांनी आज पुन्हा एकदा एकत्र येत साताऱ्यात मिसळवर ताव मारला. लोकसभा निवडणुकीपूर्वी या दोघांनी एकत्र येऊन मिसळवर मारलेला ताव जिल्ह्याच्या राजकारणात गाजली होता. त्यावेळी आ. शिवेंद्रराजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते, तर नरेंद्र पाटील शिवसेनेचे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार होते.
दरम्यान, आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. आ. शिवेंद्रराजे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण अक्षरशः ढवळून निघाले आहे. अशातच रविवरी फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने हे दोघे पुन्हा एकत्र येत मिसळ वर ताव मारत आता विरोधकांची शिट्टी वाजवू असाच जणू संदेश दिला आहे.