हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगभरात बलात्काराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला कडक शासन करण्यात याव अशी मागणी सर्व स्तरातुन केली जात असते.याच दरम्यान एका देशाने मोठा निर्णय घेतला आहे. बलात्कार करणाऱ्याला ‘नपुंसक’ करण्यात येणार आहे. बलात्काराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी आता दोषींना नपुंसक करण्याचा निर्णय नायजेरियातील कदुना प्रांतातील सरकारने घेतला आहे. तसेच 14 वर्षाखालील मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यास दोषीला फाशीची शिक्षा सुनावण्यात येणार आहे. नायजेरियातही बलात्काराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. लोकांचा रोष इतका वाढला की राज्यपालांना आणीबाणीच जाहीर करावी लागली. राज्यपाल नसीर अहमद इल रुफई यांनी गुन्हेगारांपासून लहान मुलांना वाचवण्यासाठी कडक पावलं उचलण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे.
14 वर्षावरील मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येणार आहे. देशात वाढत असलेल्या बलात्काराच्या प्रकरणांमुळे बलात्काऱ्यांवर शस्त्रक्रिया करून नपुंसक करण्यात येणार आहे. तसेच एखाद्या महिलेने देखील 14 वर्षाखालील मुलावर बलात्कार केल्यास त्या महिलेचे गर्भाशय काढून टाकण्यात येणार आहे.
यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही केलंं होतं विधान
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये बलात्काराची एक घटना समोर आली होती. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बलात्काऱ्यांना जाहीरपणे फाशी द्यावी अथवा नपुंसक करावे असं वक्तव्य केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बलात्कारातील दोषींना नपुंसक करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून भविष्यात असे कृत्य करणार नाही असं म्हटलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.