हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपल्या देशाच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात विविध देशांच्या सीमेवर अनेक सैनिक तैनात केले जातात. त्याच पद्धतीने अनेक अतिदुर्गम भागात सुद्धा सैनिकांकडून देशाचे रक्षण करण्याचे काम केले जाते. देशाच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात असतात आणि ते सीमेवर पहारा देत देशाची दिवसरात्र सुरक्षा करतात. आपल्या देशातील अति महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची सुद्धा कधी कधी सैनिकानावर येऊन पडते. व्हीआयपी मंडळींसाठी म्हणजेच अतिविशेष व्यक्तींसाठी २४ तास सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक तैनात असतात. पण एका झाडाला इतकी सुरक्षा मिळाल्याचे आपण कधी ऐकले आहे का ? नाही ना पण भारतात एक असे झाड आहे त्याला फक्त महत्वाची च नव्हे तर अति महत्वाची अशी ट्रीटमेंट दिली जाते. या झाडाभोवती २४ तास पोलिसांचा पहारा असतो. अगदी आपल्या देशाची ज्या पद्धतीने काळजी घेतली जाते. त्याच पद्धतीने या झाडाची काळजी सुद्धा घेतली जाते . त्यापाठीमागचे कारण हि तसेच आहे.
हे झाड साधारण मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळ आणि विदीशा दरम्यान च्या एका छोटाश्या गावातील सलामतपूरमध्ये हे झाड आहे. या झाडाची खासियत आहे, त्यामुळे झाडाला पाहण्यासाठी अनेक पर्यटक सुद्धा भेटी देतात. या झाडावर राज्य सरकार १२ ते १५ लाख रुपये इतका खर्च करते अशी माहिती मिळाली आहे.या झाडाच्या संरक्षणासाठी भोवताली जवळपास १२ फूट जाळी लावण्यात आली आहे. जवळपास हे झाड ८ वर्षांपूर्वी लावण्यात आलेलं आहे. भूतानचे तत्कालीन पंतप्रधान जिग्मी योजर थिंगले राजपक्षे यांनी २१ सप्टेंबर २०१२ ला हे रोपटे लावले होते. हे छोटेसे रोपटे आता डेरेदार वृक्षात बदलले आहे. हे झाड आता २० फूट उंच झाले आहे. या झाडाला आपल्या मुलाप्रमाणे वागवले जाते. त्याची खूप चांगल्या पद्धतीने त्याची काळजी घेतली जाते. या झाडाला पाणी देण्यासाठी स्थानिक नगरपालिकेकडून एका पाण्याच्या टॅंकरची व्यवस्था करण्यात आली आहे. सारे सरकारी अधिकारी मिळून या झाडाची काळजी घेतात. झाडाला कीड लागल्यानंतर त्याच्यावर अनेक उपाय केले जातात.वनसंरक्षण अधिकारी याला बोलावले जाते. त्यांच्याकडून माणसासारखी काळजी घेतली गेली.
या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये या झाडाला काही प्रमाणात कीड लागली होती. त्यामुळे या झाडाची पाने गळून पडायला सुरुवात झाली होती. हे झाड आजारी पडलं होतं. वातावरणातील बदल आणि किड्यांमुळे झाडाची पाने काळी पडायला लागली होती आणि त्यांना भोकेही पडायला लागली होती. काही पानाच्या फांद्या रुक्ष झाल्या होत्या . तत्काळ तज्ज्ञांना बोलावण्यात आलं आणि झाडावर इलाज सुरू करण्यात आले. माणसांवर ज्या पद्धतीने उपचार करतात. त्याच पद्धतीने झाडाला इंजेक्शन देण्यात आली आणि सलाईनही लावण्यात आली.या झाडाची संपूर्ण देखभाल जिल्हाधिकारी करतात. . या झाडालावेळेवर खत आणि पाणी दिले जाते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’