टीम, HELLO महाराष्ट्र |सर्वांच्या लाडक्या गणपतीचे अवघ्या काही दिवसात आगमन होणार आहे. अनेकजण १० दिवस गणपतीला विविध प्रकारच्या मोदकांचा नैवद्य ठेवतो. पण अनेकजण गणपतीला उकडीच्या मोदकाचा नैवद्य ठेवतात. त्यामुळे आपण आज हे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते शिकणार आहोत.
साहित्य –
२ वाट्या तांदूळ पिठी, २ टेस्पून मैदा, २ वाट्या पाणी , तेल किंवा तूप १ टेबलस्पून , चिमुटभर मीठ, २ वाट्या नारळ चव , १ वाटी गुळ , वेलचीपूड , तांदूळ पिठी, खसखस १ टेबलस्पून भाजून, जाडसर पूड
कृती –
प्रथम तांदूळ पिठी व मैदा चाळून घ्यावा, पाणी मोजून ठेवावे. नारळ, चिरलेला गुळ, मंद आचेवर शिजवून त्यात मीठ चिमुटभर, खसखस व तांदळाची १ टीस्पून पिठी घालून ते गॅस वरून उतरवावे. अधूनमधून ते ढवळावे म्हणजे रावल सारण होईल. त्याला थोडा वेळ थंड होऊ द्यावे. नंतर मोजलेले पाणी , चवीला मीठ व लोणी घालून पाण्याला उकळी आली की तांदूळ पिठी व मैदा घालावा. यावर ढवळून झाकण ठेवून दोन वाफा येऊ द्याव्यात. नंतर हे मिश्रण परातीत काढून पाण्याच्या हाताने उकड छान मळून घ्यावी. याचा लिंबाएवढा गोळा घेवून त्याची हातावर वाटी करून किंचित जाडसर ठेवून बाजूने पातळ दाबत दाबत मध्ये सारण करावे. नंतर तो मोदक बंद करावा. मोदक कुकरमध्ये किंवा मोठ्या पातेलीत चाळणीवर मलमलचा कपडा घालून वाफवावे. जास्त प्रमाणात मोदक करायचे झाल्यास ३-४ वेळा करावे लागतात. नाहीतर गरम पाण्यात उकडीचे भांडे ठेवून गरम मोदक करावे. त्यात सारण म्हणून खवा साखरेचे मिश्रण, आंब्याचा मावा, खसखस चारोळी, बेदाणे घालून साजूक तूप घालून सारण करता येते.
हे पण वाचा –
गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांसाठी खुशखबर
गणेशोत्सवाच्या धर्तीवर बाजारपेठा सजल्या ; साहित्य खरेदीसाठी गणेश भक्तांची झुंबड