बीडमधील सुमित वाघमारे हत्याकांडातील जामिनावर सुटलेला आरोपी भाऊ उठला बहिणीच्या जीवावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड प्रतिनिधी । महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या सुमित वाघमारे हत्या कांडांतील पीडिता भाग्यश्री वाघमारेला केस मागे घेण्यासंबंधी धमक्या आणि दबाव टाकण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. जामीनावर सुटून आलेल्या भाग्यश्रीच्या आरोपी भावानं थेट केस मागे घ्या अन्यथा भाग्यश्री व सुमितच्या संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी दिली. आपल्या बहीणीने प्रेम विवाह केल्याच्या रागातून भावाने सख्यानेच तिच्या नवऱ्याची हत्या केली होती. आता बहिणीच्या जीवावरच तो उठलाय.

यामुळे पीडित कुटुंबाने पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल करते वेळी पोलिसांनी तक्रार दाखल न करता उलट आरोपींना फोन लावून माहिती दिल्याचा आरोप भाग्यश्री वाघमारे हिने केला. यामुळे आरोपींचा मुजोरपणा आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यापूर्वी बीड जिल्हा न्यायालयाच्या आवारात भाग्यश्रीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी हा गंभीर प्रकार उघडकीस आला. आजही वाघमारे कुटुंब दहशतीखाली आहे. या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. मात्र केस साठी न्यायालयात गावाकडून बीडला येताना अपघात घडवून मारतील अशी भिती सुमितचे वडील शिवाजी वाघमारे आणि आई सुनीता वाघमारे यांनी व्यक्त केली.

प्रेम विवाहाच्या रागातून सख्या बहीणीच्या नवरा असलेल्या सुमितचा दिवसा ढवळ्या बालाजी लांडगेसह काही आरोपींनी खून केला होता. या प्रकरणातील पीडिता भाग्यश्री वाघमारे आजही दहशतीत आहे. या प्रकरणाला एक वर्ष लोटले आहे. या गुन्ह्य़ातील दोन आरोपीं गजानन क्षिरसागर, आणि कृष्णा क्षिरसागर हे जामीनावर बाहेर आहेत. हे दोघे पीडित भाग्यश्री वाघमारे व कुटुंबावर दबाव टाकून केस मागे घ्या, पैसे कितीही मागा, पण केस मागे घ्या एवढ्यावर त्या कुटुंबाने एकले नाही म्हणून थेट कुटुंब संपवण्याची धमकी दिल्याचे मयत सुमित चे आईवडील सांगत आहेत.

तसेच सुमितच्या नातेवाईकांना त्रास देत असल्याचे समोर आले आहे. या आधी तारखेसाठी बीड जिल्हा न्यायालयाच्या आवारात जीवे मरण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलीस स्टेशनला देण्यात आली होती. त्यानंतर हा प्रकार समोर आल्याने आरोपींची मुजोरी आणि दहशत दिसून येत आहे. तुझ्यामुळे माझा मुलगा जेल मध्ये आहे. तु जर पुन्हा न्यायालयात तारखेला आलीस तर सुमितप्रमाणे तुला संपवून टाकु अशी धमकी दिल्याचे भाग्यश्रीने सांगितलें आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा