भडकाऊ भाषण दिल्याबद्दल सोनिया,प्रियंका यांच्यासह ओवेसी विरोधात तक्रार दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस प्रियंका गांधी, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि रॅमन मॅगसेसे विजेते पत्रकार रवीशकुमार यांच्याविरोधात भडकाऊ भाषण दिल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. सुधारित नागरिकत्व  कायद्याविषयी (सीएए)  चारही जणांवर भडकाऊ भाषणे केल्याचा आरोप आहे. सीजेएम कोर्टाने ही तक्रार मान्य केली असून सुनावणीसाठी 24 जानेवारी 2020 ची तारीख निश्चित केली आहे.

प्रदीप गुप्ता नावाच्या वकिलाने उत्तर प्रदेशमधील अलिगड येथील मुख्य न्यायदंडाधिकारी (सीजेएम) न्यायालयात सोनिया-प्रियंका आणि ओवैसी यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत या तिघांशिवाय सुप्रसिद्ध पत्रकार रवीशकुमार यांचेही नाव आहे.

प्रदीप गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, सोनिया गांधी, प्रियांका गांधी, ओवैसी आणि रवीश कुमार यांनी नागरिकत्व कायदा (सीएए) बद्दल लोकांमध्ये चिथावणीखोर चर्चा पसरवल्या आणि सामाजिक सलोख्याला बाधा पोहचली.

Leave a Comment