भीमा कोरेगाव हिंसाचार : वरवरा राव यांना २६ पर्यंत पोलीस कोठडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी स्थानबद्ध असलेले डावे विचारवंत वरवरा राव यांना पुणे न्यायालयाने २६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

त्यांच्या स्थानबद्धतेची मुदत १७ नोव्हेंबर रोजी संपल्यानंतर त्यांना पुणे पोलिसांनी तेलंगणा येथून ताब्यात घेतले होते. तेथून त्यांना पुणे सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी नक्षलींशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी प्रा. वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा यांना २८ ऑगस्ट रोजी अटक केली होती. मात्र, अटकेची कारवाई बेकायदा असल्याचे सांगत यातील काहीनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. वरवरा राव यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यांनी हैदराबादमधील न्यायालयात केलेला अर्ज शनिवारी फेटाळण्यात आला होता.

Leave a Comment