पुणे | ‘भीम आर्मी संघटनेने भीमा कोरेगाव क्रांन्ती दिनानिमित्त आयोजीत केलेल्या सभेला पुणे पोलिसांनी परवानगी देऊ नये’ अशी मागणी समस्त हिंदू आघाडी चे मिलिंद एकबोटे यांनी केली आहे. गेल्या वर्षी ३० डिसेंबर रोजी शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेमूळेच भीमा कोरेगाव हिंसाचार घडल्याचा आरोपही एकबोटे यांनी यावेळी केला. यापार्श्वभुमीवर यावर्षी असा हिंसाचार घडू नये याकरता खबरदारीचा भागा म्हणुन पोलीसांनी भीम आर्मी च्या नियोजीत सभेला परवानगी देऊ नये असे एकबोटे यांनी म्हटले आहे.
मिलिंद एकबोटे हे समस्त हिंदू आघाडी चे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि भीमकोरेगाव प्रकरणातील केस त्यांच्या विरोधात सध्या न्यायालयात आहे. भीमाकोरेगाव दंगल नक्षलवादी लोकांनी केलेला कट होता असा त्यांचा प्रमुख आरोप आहे.
काही महिन्यापूर्वी भीमा कोरेगाव हिसांचारात नक्षलवाद्यांचा हात असल्याच्या संशयावरुन शहरी नक्षलवादाच्या नावाखाली सुरेंद्र गडलिंग, सुद्धा भारद्वाज, शोमा सेन, वरवरा राव, अरुण परेरा, महेश राऊत, यांना पुणे पोलीसांनी अटक केली होती.