मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेनेचे सरचिटणीस व ‘खळफट्याक’ फेम अशी ओळख असणारे नितीन नांदगावकर यांनी बुधवारी रात्री उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहिर प्रवेश केला आहे. त्यामुळे मुंबईत मनसेला मोठा धक्का बसला आहे.
नितीन नांदगावकर हे मनसेचे डॅशिग नेते म्हणून ओळखले जातात. आज त्यांनी मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी बोलताना नांदगावकर म्हणाले की, उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मी शिवसेनेत जाहिर प्रवेश करत आहे. विधानसभा निवडणुकीत संपुर्ण राज्यात शिवसेना भगवा फडकवणारच अशी ग्वाही देत यापुढे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काम करून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचा मी प्रयत्न करणार असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेना सरचिटणीस @NitinNandgaonk3 जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/tgVAVpmZmP
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) October 2, 2019