औरंगाबाद प्रतिनिधी | मराठवाडा दुष्काळाच्या झळा सोसत आहे. पाण्याचे हे संकट दूर सारण्यासाठी येत्या काळात साडेतीन लाख कोटी रुपये पाण्याच्या जलजीवन मिशन योजना राबवून या योजनेवर खर्च केले जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज औरंगाबादेत केली. मोदी हे दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या ऑरिक सिटी उद्घाटन आणि महिला मेळाव्यासाठी आले असताना आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
व्हीओ.शेंद्रा एमआयडीसी येथे राज्यस्तरीय उमेद महिला सक्षमीकरण मेळावा आज सम्पन्न झाला यावेळी महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांचा ३९ जिल्ह्यात विस्तार करण्यात आला असून महिलांना आत्मनिर्भर बनण्यासाठी शून्य टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन शेंद्रा एमआयडीसी येथे राज्यस्तरीय उमेद महिला सक्षमीकरण मेळाव्यास ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांनी प्रास्ताविक करतांना दिले.
दोन रात्र न झोपता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे औरंगाबादेत दाखल झाले. औरंगाबादच्या औद्योगिक क्रांतीसाठी आजचा महत्वाचा दिवस असून देशातील पहिल्या स्मार्ट सिटीतील महत्वाच्या प्रकल्पाचा आज प्रारंभ झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. गेल्या चार वर्षापासून मराठवाड्यात दुष्काळ आहे. त्यामुळे येत्या पुढील काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुढील मिशन हे पाण्यासाठीच असणार आहे. ‘जल है तो कल है’ ही विचारधारा घेऊन विविध योजना राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले.यावेळी त्यांच्या समवेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे मंत्री पियुष गोयल,केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची उपस्थिती होती.
इतर आणखी बातम्या –
आंदोलनकर्त्या पूजा मोरेंची मोदींच्या दौऱ्या आधी अटक अन सुटका https://t.co/pzmg2KB1eg pic.twitter.com/oUhsr7v5sZ
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) September 7, 2019