“मराठा आरक्षण देणे आमच्या हातात नाही” – चंद्रकांतदादा पाटील

thumbnail 1530367057316
thumbnail 1530367057316
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देणे आमच्या हातात नाही असा निर्वाळा देत राज्याचे महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मराठा आरक्षणातून काढता पाय घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण देणे सरकारच्या हातात नसून त्याचा निर्णय मागास आयोगाच्या अहवालावर अवलंबून असल्याचे पाटील यांनी म्हणले आहे. ‘मराठा आरक्षणाचा विषय उच्च न्यायालयाने मागासवर्गीय आयोगाच्या अक्त्यारीत समाविष्ट केला असल्याने मराठा आरक्षण देणे आता सरकारच्या हातात राहिलेले नाही’ असे म्हणून चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर वेळ मारून नेला आहे. मुंबई येथे मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहीती दिली आहे.

मराठा समाजाला आरक्षणा नंतर मिळणाऱ्या सवलती आम्ही आत्ताच देण्यास सुरू केल्या आहेत. वैद्यकीय शिक्षणाची फीची सवलत ५०% वर आणली असून या पुढे मराठा समाजाच्या मुलांना एकुण फी च्या निम्मी फी भरून प्रवेश दिला जाणार आहे.” असे पाटील यांनी सांगीतले आहे. सरकारने फि सवलती संदर्भात जी.आर. काढला असून यापुढे मराठा समाजातील मुलांची निम्मी परिक्षा फि सरकार्फे भरली जाणार असल्याचे पाटील यांनी यावेळी जाहीर केले आहे. आठ लाखांपेक्षा कमी आर्थिक उत्पन्न असणार्या मराठा समाजातील विद्यर्थ्यांना ही सवलत मिळणार असल्याचे त्यांनी नमुद केले आहे.